राजमुद्रा : राजधानी दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 चा निकालात अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.. दिल्लीतील आपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात भाजपला यश आल असून 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या सोबतच आता माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही दारून पराभव झाला आहे.. त्यामुळे आता 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचे कमळ फुलणार आहे..
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आप मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.. यात आता भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला एक ही जागा मिळालेली नाही..त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. तसेच आपच्या पराभवात पक्षाचा हुकमी एकाचं म्हणजे अरविंद केजुराल यांचाच मोठा पराभव झाल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे..
दरम्यान दुसरीकडे पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झाला आहे. त्या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. आतिशी यांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेतली आणि त्या 2700 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे. या निकालानंतर भाजपला बहुमत मिळाला असून आता भाजपच्या गोटात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
भाजपमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये दलित नेते दुष्यंत गौतम,माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र परवेश वर्मा आणि भाज्याचे ज्येष्ठ नेते विजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे.. या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे..