राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपचा पराभव होताच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आता अण्णा हजारेंच्या या प्रतिक्रियेला शरद पवार गटाचे नेते आणि आमदार उत्तम जानकर यांनी जोरदार पलटवार दिला आहे.. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शंभर टक्के मला अपेक्षित होता भाजपवाले केजरीवाल यांचा पराभव करणार मात्र आता या पराभवावरून बोलणारे अण्णा हजारे हे अण्णा हजारे राहिले नाहीत. ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे झाले आहेत. अण्णा हजारे आता तटस्थ नाहीत. ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत”, अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजुराल यांच्या पराभवावर बोलताना त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले. आता अण्णा हजारेंच्या या प्रतिक्रियेवर शरद पवार गटाच्या नेत्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे आता भाजपच्या विचारांचे झालं असल्याचा त्यांनी म्हटले आहे.. या विधानसभा निवडणुकीत भाजपवाले केजरीवाल यांचा पराभव करणार आणि निवडून येणाऱ्या 25 जागाच तुम्हाला ठेवणार. उर्वरित सगळ्या जागांवर सेटिंग , प्रोग्रामिंग करणार आहेत. त्यावरच त्यांचा फोकस आहे अशी हिंट मी दिली होती”, असे उत्तम जानकर म्हणाले. दरम्यान आता दिल्लीत आपला मोठा धक्का बसला आहे..
या निवडणुकीत भाजपच्या शून्य जागा आल्या असत्या. आपच्या 60 जागा आल्या असत्या. तर काँग्रेस सात ते आठ जागांवर विजयी झाले असते”, असा दावाही आमदार उत्तम जानकर यांनी केला. “काँग्रेसची संघटना दिल्लीमध्ये मजबूत नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये बदल करून दिल्लीमध्ये चांगली संघटना करणे गरजेचे आहे”, असेही उत्तम जानकर यांनी म्हटले. मात्र यावेळी भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरला असून भाजपने सत्ता मिळवली. आप ला सतेबाहेर जावं लागला असल्याचा त्यांनी म्हटलं..