राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमधील युती आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआडबाबत मोठे खुलासे केले आहेत.. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं..मात्र त्यांना ते पद देण्यास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नकार दिला.. यानंतर त्यांना मीच उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे युतीतून बाहेर का पडले याचेही कारण त्यानीं स्पष्ट सांगितलं..
लोकसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या युतीबाबत खुलासा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, आमची युती फायनल झाली होती पण एका रात्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं.. आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे असल्याची गोष्ट मी वरिष्ठांच्या कानावर घातली आहे.. यावर निर्णय घेऊ शकत नाही असेही मी त्यांना सांगितले.. आमचे अध्यक्ष अमित शहा त्यावर निर्णय घेतील मात्र त्यांनीही.. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण मजूर नाही असं सांगितलं असं त्यांनी सांगितलं..यावर त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर आम्ही युती करणार नाही असा उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे हे मी अमित शहा यांच्यावर कानावर टाकलं असं त्यांनी सांगितलं.. बोलताना आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊ शकतो असंही म्हटल्याच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या 2019 मधील राजकीय घडामोडीतील दावे खोडून टाकले आहेत.. भाजपचा आकडा 120वर गेला असता तर उद्धव ठाकरे कधी सोडून गेले नसते. पण त्यांच्या लक्षात आलं की आपला नंबर फसत आहे आपण सरकार बनवू शकतो तेव्हा त्यांनी आपला रंग बदलला असल्याचा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.