जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हातील जलसंपदा विभागातील रिक्त जागेवरील विविध पदे रिक्त असल्याने पदस्थापना करण्याची मागणी राज्याचे जलसंपदा मंञी जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी मंञालयात ना. पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
जळगाव जिल्हातील जलसंपदा विभागांर्तगत अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रथम लिपीक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा चौकीदार शिपाई, सी.आर.टी.आदी संवर्गातील एकूण ७८६ अधिकारी, कर्मचारी रिक्त झाल्याने या रिक्त जागेवर नव्याने पदस्थापना करणे आवश्यक आहे. याबाबत दिव्या भोसले यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली.