राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.. त्याच्यासोबतच ठाकरेंचें दोन माजी आमदार ही त्यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजन साळवी यांनी फोन केल्याची माहिती समोर आली असून पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.. त्यामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे..
या पक्षप्रवेशाबाबत मिळालेल्या माहितीनुसार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजन साळवींनी 10 तारखेऐवजी १३ तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान आता माजी आमदार सुभाष बने यांचाही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला असल्याची चर्चा आहे.. येत्या 15 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी हा पक्षप्रवेश होणार आहे.. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेही मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत..सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे..
दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले असल्याची चर्चा रंगली आहे.. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप पक्षाची ताकद वाढण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना ठाकरे गटातील कोकणातील तीन आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे हा भाजपला धक्का आहे..
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार कंबर कसली असून शिंदेंच्या सेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आला आहे.. हे ऑपरेशन अंतर्गतच आता अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे..