राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारत आपचा दारुण पराभव केला. राजधानी दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपने सत्ता काबीज केली..या पराभवाचे विश्लेषण करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेससह अण्णा हजारेंना चांगलाच टोला लगावला आहे..केजरीवाल हारल्याचा आनंद काँग्रेसला झाला असेल दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या म्हणन्याला काय आता विशेष अर्थ उरला नसल्याचाही त्यांनी म्हटलं आहे..
या मोदी सरकारच्या काळात देशात, महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, लोकशाहीवर हल्ले झाले, अत्याचार झाला. तेव्हा अण्णा हजारेंनी त्याविरोधात कधीच हालचाल केली नाही. साधा शब्द सुद्धा काढला नाही.. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.. हा आनंद लोकशाहीला मारक आहे, असा हल्लाबोल त्यांनी अण्णांवर केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी आप आणि काँग्रेसने एकत्र लढायला हवे होते.. एकत्र आले असेल तर निकाल वेगळा असता हे आकडे सांगत आहेत. आता लढायचा की एकत्र यायचा याचा विचार नेत्यांनी करायला हवा, याविषयीची भूमिका सगळ्यांनी घेणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले.
केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठे आंदोलन उभं केले होते. या आंदोलनामुळेच अण्णा देशाला माहिती झाले. पण गेल्या 12 वर्षात या देशावर अशी अनेक संकटं आलीत. देश लुटला जात आहे. विकल्या जात आहे. यावर अण्णा हजारे यांनी काही मत ही व्यक्त केलं नाही.. अण्णा हे आता भाजपचा विचारांची आहेत असंही त्यांनी म्हटलं..