राजमुद्रा : राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक घेतली.. या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात आली असून पक्ष वाढीवर भर देण्यात आला आहे.
आगामी मनपा निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपनेही महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्शन मोडवर आली आहे. शिवतीर्थावर झालेल्या या बैठकीत मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या. या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमची पक्षवाढीसाठी बैठक झाली. यावेळी संघटनात्मक पातळीवर चर्चा झाली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल नेहमी आपले मत मांडत असतात.. महाराष्ट्रातील मराठी टिकून राहावी तसेच हिंदुत्वाला महत्त्व मिळावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.. आता विधानसभा निवडणुकीनंतर आगामी होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे..