राजमुद्रा : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी “शिवतीर्थ” वर दाखल झाले असून गेल्या अर्धा तासापासून त्यांच्यत चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे..
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीवर रोखठोक मत व्यक्त करत संशय व्यक्त केला होता.. त्यानंतर आता होणाऱ्या आगामी स्थानी स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत.. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित आहेत. या भेटीचे कारण अद्या स्पष्ट झाले नाही.. मात्र विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत..
. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा? त्यांच्या भेटीमागचे नेमकं कारण काय? त्यांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार? त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.