राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.. राजपुत्र अमित ठाकरे यांना आता भाजपच्या गोटातून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप यांचं एकत्र समीकरण दिसू शकत..त्यामुळेच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे..
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे… यासाठी मनसे आता ॲक्शन मोडवर आले असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे. यावर मनसेनेचे प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे..अमित ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करावं न करावं, याचा निर्णय राज ठाकरे घेतील. दिल्लीतील विजयने भाजपचा हौसले बुलंद आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला..
विधानसभा निवडणुकीत झालेल्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी evm वर संशय व्यक्त केला होता… त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं.. एकीकडे मनसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या वादास रूपांतराचा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा वादात झाली काय अशी चर्चा सुरू झाली आहे.. मनसेच्या नादात महायुतीतील मित्र पक्षात वाद पेटणार का?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..