राजमुद्रा : राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी संविधानाविषयी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद पेटणार आहे.. नाशिक मधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीत महापुरुषांचे फोटो असल्याचा दावा करत संविधानाची मूळ प्रत पुन्हा छापावी, त्याला कोण विरोध करतो हे बघू असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
नाशिक मधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाची मूळ प्रत छापली पाहिजे बघू कोण विरोध करत असं त्यांनी म्हटले..बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं ते छापलं नाशिकच्या प्रेसमध्ये, इंग्लिशमध्ये होते त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्या संविधानामध्ये अनेक चित्रं होती, पण ती काढली. आता आपण परत आवाज उठवला पाहिजे. आपण भारत मातेचे पुत्र म्हणून ही मागणी केली पाहिजे,, असंही त्यांनी म्हटलेसार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार यावर्षी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे बोलत होते.. आता त्याच्या वक्तव्याने नवा वादाला तोंड फुटणार आहे..
पुढे बोलताना त्याने असेही म्हटले की नाशिक मधील असणाऱ्या काळाराम मंदिरात बाबासाहेबांनीं भेट दिली होती.., याच शहरात कुसुमाग्रजांना भेटलो होतो. मी अन्न पुरवठा मंत्री होतो तेव्हा कुसुमाग्रजांना भेटलो होतो, त्यावेळी रेशन कार्डवर त्यांची कविता छापली होती..तसेच नाशिक शहर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. पण याच ठिकाणाहून सितेचं हरण झालं. आजही काही घरांमध्ये सीतेला वनवास भोगावा लागतो असंही त्यांनी म्हटले.