राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचा एक एक आमदार आपल्या गळाला लावला जात आहे.. अशातच आता भाजपची ठाकरे विरोधात नवीन खेळी दिसून येत आहे..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचे तीन प्रमुख शिलेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.त्यात मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांचा समावेश होता. मला भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ठाकरेंच्या शिलेदारांनी घेतलेल्या भेटीचे कारण आता समोर आला असून त्यांनी दादारमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट झाल्याचे खासगीरित्या या नेत्यांकडून सांगण्यात आले. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण होत आले असून पुढील कामासाठी त्यांची ही भेट होती..दरम्यान या भेटीनंतर या तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. अंबादास दानव यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात ही भेट होती की इतर कोणते राजकीय कारण होते? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान दुसरीकडे आगामी होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी केली असताना मनसेही ॲक्शन मोडवर आला आहे… मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल अर्धा तास चर्चा झाली.. आता यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक होती, असे आता भजपा नेते सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. परंतु राजकीय निरीक्षक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढत आहे. या भेटीगाटीमुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार कंबर कसली असून शिंदेंच्या सेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आला आहे.. हे ऑपरेशन अंतर्गतच आता अनेक ठाकरे गटाच्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे.. त्यामुळे ठाकरे गटालाही मोठा धक्का बसत आहे.