राजमुद्रा : उत्तर प्रदेश मधील प्रयागराज मध्ये मागील महिन्यापासून महाकुंभमेळा सुरू आहे.. या महाकुंभमेळा मध्ये जगभरातून कोट्यावधी भाविकांनी आणि नागा साधुनी त्रिवेणी संगमांमध्ये अमृत स्नान केल आहे.. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गंगेमध्ये स्नान केलं. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हीआयपी अमृत्स्नानावरून सरकारवर जोरदार निशाणा साधत आरोप केला आहे.. राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
महाकुंभात स्नान करण्यासाठी राष्ट्रपती आल्यानंतर कुंभमेळा इतरांसाठी थांबवण्यात आला.. त्रिवेणी संगमवर कोणालाही जाऊ दिलं नाही तीन ते चार कोटी लोक तिथे होते . कोट्यवधी लोकांना रोड अॅरेस्ट करण्यासारखा प्रकार घडला आहे. त्यांना एक इंच पुढे जावू दिले नाही. असा घनघातच खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने कुंभमेळ्यात केलेल्या व्हीआयपी कल्चरचा फटका या भाविकांना बसत आहे.. दुसरीकडे विमान कंपन्या लूट करत आहे तर रेल्वेत जागा नाही रिक्षावाले लूट करत आहे हा काय कुंभमेळा आहे का? असा सवाल ही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे..
प्रयागराज मध्ये भाविकांची प्रचंड लूट सुरू आहे… राष्ट्रपतींना स्नान करण्यासाठी 12 तास लागतात का त्या काळात भाविकांची प्रचंड गर्दी होती तरीही त्यांना रोखण्यात आलं.. कोट्यावधी लोक रस्त्यावर होते कुंभमेळा हा राजकीय सोहळा करून टाकला आहे.. त्यामुळे हिंदूंचं सरकार निवडणार्यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर विचार करायला हवा असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी मतदारांना दिला.. आता खासदार संजय राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे..