राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळत मतदारांनी थेट त्यांना बहुमतापर्यंत पोहोचवल्याने महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कमी महत्त्व प्राप्त झालं.. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली.. तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आलं.. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सूत्रे आपल्याकडे घेतली असून या समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्याजागी वर्णी लावली होती.. या निर्णयानंतर महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समावेश करण्यासाठी निर्णयात बदल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना वगळण्याचा घेतलेला निर्णय फिरवण्याचा विचार केला असून आता आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वाइल्ड कांर्डन एकनाथ शिंदे यांना एन्ट्री देणार असल्याची माहिती समोर आली आहे.. मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल केला जाणार आहे.. दरम्यान यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री,वित्तगृह,महसूल मंत्रांसह आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन मंत्रांचा समावेश होता.. आता यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ही समावेश करून घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे..
महायुती सरकारनं नऊ सदस्य प्राधिकरणाची घोषणा केली यामध्ये राज्याचे मुख्य सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.. महायुती सरकारमध्ये भाजपा पाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे.. शिवसेनेकडे 57 आमदारांचा पाठबळ आहे.. तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे 41 आमदार आहेत… असे असताना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांना वगण्यात आल्यानं शिंदे गटात हे नाराजी पसरली.. हे नाराजी दूर करण्यासाठी आता आणि विरोधकांकडून या विषयावर होणाऱ्या टिकेला थांबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम 2019 मध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय तसेच या समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..