जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची सध्या ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे १२ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकनाथ खडसे यांना विनाकारण ईडीची चौकशी लावली असून, भारतीय जनता पार्टीलाच्या इशाऱ्यावर हा खेळ सुरू आहे. एकनाथ खडसे यांना कारण नसताना त्रास देणे, अडकविणे सुरू आहे. या माध्यमातून खडसे यांना कारण नसताना चौकशीच्या नावाखाली खेळ सुरू आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक १२ जुलै रोजी निषेध केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी केले आहे.