राजमुद्रा : देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. या सत्कार सोहळ्यावरून महाविकास आघाडी जोरदार ठिणगी पडली असून ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही अप्रत्यक्षपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती आता त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनीही शरद पवारांवर विश्वासघाताचा ठपका ठेवला आहे.महाविकास आघाडीचा पोपट मेला हे वर्षभरा आधी फडणवीस म्हणाले होते. तीच स्थिती आज आधी संजय राऊत आणि नंतर विनायक राऊतांच्या शरद पवारांवरील टिकेनंतर आली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
राजधानी दिल्लीत नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पवारांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.. त्यानंतर ठाकरेची शिवसेना आक्रमक झाली.. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शत्रूंचा सन्मान केल्याची टीका केली पण विनायक राऊतांनी शरद पवारांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यामुळे महाविकास आघाडीत जोरदार ठिणगी पडल्यास दिसून येत आहे..
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांमुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली पण संजय राऊतांनी अचानक ट्रॅक बदलल्याने काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. काही दिवसा आधी स्वतः उद्धव ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते.राऊतांची शरद पवारांवरील टीका म्हणजे स्वबळावर लढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती आहे का? असा सवालच आता उपस्थित केला जात आहे.. दरम्यान दुसरीकडे शिंदेंच्या सत्कार सोहळ्याचे वादळ ताजे असतानाच उद्धव सेनेला दुसरीकडे धक्क्यावर धक्के बसत आहेत..