राजमुद्रा : गेल्या काही दिवसापासून कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, राजन साळवी नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.. अखेर आज राजन साळवी हे ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.. आज दुपारी तीन वाजता मोठ्या शक्ती प्रदर्शनासह साळवींचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे.. शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचा एक एक आमदार आपल्या गळाला लावला आहे.. दरम्यान आज दुपारी साळवी हे ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत साळवींवर टीका केली आहे. ते पराभवानंतरच भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते, चाचपणी सुरू होती असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खलबळ उडाली आहे..
राजन साळवे यांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.. याबाबत बोलताना ते म्हणाले, एकदा सत्तेची लालूच लागली, कॉन्ट्रॅक्टरशिपची लालूच लागली की भविष्याकरता त्यांना अशी दुर्बुद्धी सुचते, तसाच हा प्रकार आहे” असा टोला राऊत यांनी लगावला. दरम्यान आज ठाकरेंना ती जय महाराष्ट्र करून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती घेणार आहेत.. मोठ्या शक्ती प्रदर्शनानं त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे..