राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस आता ॲक्शन मोडवर आली असून पक्षात त्यांनी मोठे फेरबदल केले आहेत.. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून नाना पटोले यांना हटवून आता त्यांच्या जागी राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय हर्षवर्धन वसंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात काँग्रेसला नवी भरारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसन नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.. याआधी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. अखेर हा राजीनामा काँग्रेस वरिष्ठांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांनी बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केला आहे.. ते काँग्रेस विधिमंडळ पातळीवर सुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित आहेत..ते तरुण असल्यापासून गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.