राजमुद्रा : गेल्या दोन वर्षापासून सातत्याने हिंसाचाराच्या घटनांनी दुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मणीपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन.सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.. या राजीनाम्यानंतर त्यांनी राज्यामध्ये तीन महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता.. अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपला राजीनामा देण्याआधी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती..9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केला होता. मणिपूर विधानसभेचे अधिवेशन 10 फेब्रुवारी 2025 रोजी होणार होते. मणिपूर सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधक करत होते. त्यानंतर बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता धगधगत्या मनिपुर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मणिपूर मधील हिंसाचारात जवळपास 200हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक विस्थापीत देखील झाले आहेत.. मनिपुर मध्ये मी 2023 पासून मैतई आणि कुकि झो समुदायांमध्ये जातीय संघर्ष सुरू आहे.. भाजपाने बिरेनसिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या दावेदरासाठी मते तयार करण्यासाठी प्रयत्न केले.. मात्र भाजपला यश आले नाही.. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेस आणि इतर राजकीय विरोधाकडून सातत्याने केली जात होती.. त्यानंतर अखेर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली..