राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिंदेचीं शिवसेना आता चांगलीच ॲक्टिव्ह मोडवर आली आहे.. सध्या शिवसेनेच्या “ऑपरेशन टायगर” ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून या ऑपरेशन अंतर्गत ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचें अनेक नेते शिंदेच्या गळाला लागत आहेत.अर्जुनी मोरगाव विधानसभेचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मुंबई येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विशेष म्हणजेच तिसऱ्या आघाडीकडून सुगत चंद्रिकापुरे यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेची वाट धरली.येत्या 20 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील इनकमिंग गेल्या काही महिन्यात वाढलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक दिग्गज नेतासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे… गेल्या काही महिन्यांत काँग्रेससह इतर पक्षांनाही गळती लागली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना पक्ष मजबूत होण्याच्या मार्गावर आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला कोण कोण प्रवेश करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्षलागलं आहे.