राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती अजूनही थांबायला तयार नाही..ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.राजन साळवी यांच्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे..
आगामी मनपा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना आता विदर्भातील बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.. त्यामुळे विदर्भातून ठाकरेनां मोठा धक्का बसला आहे.. ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. मुकेश जीवतोडे यांच्यासोबतच विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला आहे.
मुकेश जिवतोडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.. यात ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांना 50 हजार मताने मिळाली होती.. शिंदे गटातील प्रशांत जीव तोडी यांनी ठाकरे गटाने महाविकास आघाडी बद्दल गौप्यस्फ़ोट देखील केले.. तसेच कार्यकर्त्यांची जाणीव फक्त एकनाथ शिंदेचे यांना असल्याचही त्यांनी म्हटलं… त्यामुळे आज मी प्रवेश केलेला आहे. आमच्या चंद्रपूरमध्ये एकही आमदार नसला तरी 2029 ला सहापैकी 3 आमदार आमचे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..