राजमुद्रा : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यात मुंबईतील पेंटट कार्यालयाच्या मुद्द्यावरून ट्विटर वॉर सुरू झाले आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. मुंबईतील ट्रेडमार्क आणि पेटंट कार्यालयाचे प्रशासन आणि वित्त विभाग दिल्लीत हलवण्या वरून हा वाद सुरू झाला आहे..
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पेंटट कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आरोप केला..यां आरोपानंतर पियुष गोयल यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कार्यालय नव्हे तर फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं उत्तर गोयल यांनी दिलं आहे. आणि हे विभाग का हलवण्यात आले, याची कारणही त्यांनी दिली आहेत. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं मुख्य कार्यालय हे वडाळ्यात आहे. आणि याच कार्यालयावरून आता आदित्य ठाकरे आणि पियुष गोयल यांच्यात वाद सुरू झाला आहे.
आदित्य ठाकरे यांनी दुपारी तीन वाजता एक पत्र ट्विट करतपेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क नियंत्रक जनरलचं वडाळा अँटॉप हिल येथील कार्यालय मुंबईतून दिल्लीत का हलवण्यात येतंय? असा सवाल विचारला होता. मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलं, ती मुंबईकरांचा विश्वासघात करतायत अशी टीका आदित्य ठाकरेंनी पियुष गोयल यांच्यावर कली. त्याला गोयल यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. तुमची आक्रमकता आणि बालिशपणा आणि अर्धवट माहितीच्या आधारे आहे असा टोला त्यांनी लगावला..