राजमुद्रा : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका करत असतात.. आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडकडून हल्लाबोल चढवला आहे.. एकनाथ शिंदे यांनी मला शहाणपणा शिकवू नये..काय करायचं काय नाही हा शहाणपणा त्यांनी मला सांगू नये… त्यांनी प्रामाणिकपणे नाही तर पैशाच्या बळावर, खोटी कामं करून निवडणूक जिंकली आहे असं म्हणत राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला.
शिवसेना पक्षात फूट पडली नसती..बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात घरगड्यासारखी वागणूक दिली गेली असा आरोप करत म्हणून उठाव केल्याचं विधान एकनाथ शिंदेंनी केलं होतं. या विधानाला देखील त्यांनी पलटवार केला आहे.. एकनाथ शिंदेनी उठाव वगैरे काही केला नाही, ते ईडीला, सीबीआयला घाबरून पळालेत. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालं, त्या सरकारचे ते प्रमुख होते. संपूर्ण न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवलं आहे. असा आरोप संजय राऊत त्यांनी केला आहे..
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्याला म्हणजे एकनाथ शिंदे यांना नगर विकास खाते दिले.. एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे… मुख्यमंत्री हे कधीच नगर विकास खात सोडत नाहीत..फडणवीसांकडे पहा, त्यांनी सोडलं का ? पण उद्धव ठाकरेंनी खोटारड्या माणसाला दिलं असा घणाघाती हल्ला राऊत यांनी केला आहे… आता त्यांच्या यां टीकेला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागला आहे..