मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने एकनाथ खडसे यांनाही समन्स बजावले. यावरून पुन्हा राज्यात या प्रकरणाची जोरदार खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोमणा मारला आहे की, ‘ती सीडी कुठे गेली?’ असती तर ते आतापर्यंत थांबले नसते. खडसे नुसती हूल उठवत आहेत. त्यांच्याकडे सीडी असती तर, त्यांनी शांत राहण्याचे कारण नाही. दरम्यान दरेकर यांनी संजय राऊत यांच्या टीकेलाही उत्तर दिले आहे. ते म्हणाले राऊत यांना राणेंचे खाते छोटसं वाटणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांना राणेची उंची माहित होती. त्यामुळे त्यांनी राणे यांना मुख्यमंत्री बनवले होते असे ते म्हणाले.