राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने पक्षात मोठे फेरबदल केले आहेत.. नुकताच नाना पटोले यांना डच्चू देण्यात आला असून काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आले आहे हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन खेळी केलेली आहे….हर्षवर्धन सपकाळ यांच्या पक्षाच्या माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळ घालण्यास सुरवात करण्यात आली आहे. परतूर विधानसभेचे कॉंग्रेस चे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचा उद्या अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.. त्यामुळे नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना हा मोठा धक्का असणार आहे..
राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून काँग्रेस पक्ष पोखरायला आता सुरुवात झाली आहे…परतुर- मंठा मतदारसंघचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते सुरेशकुमार जेथलिया हे उद्या परतुर मध्ये सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.सुरेश जेथलिया हे 2009 ते 14 या कालावधीत परतूरचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.
आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता.कॉंग्रेस पक्षातील विधानसभेतील पराभूत माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गळ घातला आहे.
काँग्रेसचे नेते सुरेश कुमार जिथिलिया यांच्याबरोबर आता २८ फेब्रुवारी रोजी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबरडे यांचा नांदेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश आमच्या पक्षात होणार असल्याचे वक्तव्य केलं होतं त्यानुसार एका मागून एक पक्षप्रवेश होत आहे.