राजमुद्रा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यामुळे राजकारण तापला असतानाच आता राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली.त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? कसली खलबतं झाली ? असे या राजकीय चर्चांना उधाण आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर आता स्पष्टीकरण दिला आहे,, ते म्हणाले, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे तीन नवे कायदे तयार झाले आहेत, त्या तिन्ही कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या मुद्द्यावर ती म्हणाले, हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंलबजावणी कशी झाली आहे ? त्याच्याकरता ज्या इन्स्टिट्युशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायतं होतं, त्याची तयारी किती झाली आहे ? याची माहिती आम्ही घेतली.
दरम्यान या तिन्ही कायद्या संबंधित किती केस रजिस्टर झाल्या त्याची माहिती घेतली. फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन कशा केस घेता येतील त्याची माहिती दिली. किती लाख लोकांचं ट्रेनिंग पूर्ण झाली त्याची माहिती अमित शाह यांना आम्ही दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले.