राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिंदेंची शिवसेना चांगलीच ऍक्टिव्ह मोडवर आली आहे.. सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सर्वत्र सुरू आहे.. या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाला मोठे धक्क्यावर धक्के बसत आहेत.. शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतले.. राजन साळवी यांच्यानंतर आता बडे नेते शिंदेच्या गळ्याला येतील असा दावा देखील करण्यात आला आहे.. कोकणात ऑपरेशन टायगरची धास्ती ठाकरे गटाला बसली असून ठाकरे गटाने तडकाफडकी निर्णय घेत कोकणातील प्रमुख तीन नेत्यांची हकालपट्टी केली आहे..
ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळुण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाने पक्षातून हाकालपट्टी केली आहे.. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आणि मनपा निवडणुकीसाठी शिंदेंचे ऑपरेशन टायगर कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकारी नेत्यापर्यंत प्रत्येक जणाला वेळ लावून शिंदेसेनेत आणण्याचा प्रयत्न करत आहे.. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत अनेक नेते शिंदे प्रवेश करत आहेत.. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाच पैकी चार जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले.. यामुळे कोकणात ही महायुतीचा धबधबा दिसून येत आहे… दरम्यान अशातच आता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीतील जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चंपक मैदानावर त्यांची भव्य सभा होणार असून ठाकरेंची पदाधिकारी त्यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतील. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढणार असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकांमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी उद्धव सेना खेळतोय करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या सेनेकडून होत आहे..
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा कितपत महत्वपूर्ण ठरणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..