राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप उसळला आहे… हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त भेट घेतली.. आता या भेटीने नवीन वादळ निर्माण झालं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.. भाजप आमदार सुरेश धस यांना ही भेट चांगलीच भोवली असून मनोज जरांगे पाटील, अंजली दामानिया यांच्यासह विविध राजकीय पक्षांकडून त्यांचा समाचार घेतला जात आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मोठा आरोप केला आहे. या आरोपामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगलीच वाढ होणार आहे..
या भेटीवरून बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची तीन ते चार तास भेट झाली म्हणजे त्या भेटीत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याला वाचवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे असा आरोप केला आहे..दरम्यान या भेटीमुळे भाजपचे आमदार सुरेश धस टीकेचे धनी बनले आहेत.. या भेटीवर बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णाण्यात नेलं होतं.. त्यामुळे नेमकं काय झालं?त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी जाऊन भेट घेतली.. तब्येतीची विचारपूस करण्यात काय गैर आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला..
बीड प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा सर्व स्तरातून जोर धरला असताना भाजपाचे सुरेश धस यांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता.. त्याने त्यांची भेट घ्यायला नको होती.. धस यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.. त्यांनाही प्रकरण मिटवायचं होतं का?असा सवाल देखील तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. आम्ही हे प्रकरण सोडणार नाही..मी धनंजय देशमुख यांच्या कुटुंबीयांची जाऊन भेट घेणार असल्याचा तृतीय देसाई यांनी म्हटलं आहे..