राजमुद्रा : फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद घेतले नसतं तर शिवसेना फुटली नसती.. आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत जे लोक आहेत ते एक-दोन वर्षात एकही राहणार नाही.. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले असल्याचा आरोपच त्यांनी त्यांच्यावर केला आहे..
बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली असून त्यानीं पाठीत खंजीर खुपसण्याचा काम केला आहे.. आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.. दरम्यान दुसरीकडे आगामी मनपा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केला आहे. ऑपरेशन अंतर्गत ठाकरे गटातील एकेक आमदार गळाला लावण्याचे काम सुरू आहे..नुकताच माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवले. एकनाश शिंदे यांनी दिवसरात्र काम केले. मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो. पण रात्रंदिवस काम करणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असे रामदास कदम यांनी मनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कौतुक केलं..