यावल राजमुद्रा वृत्तसेवा | वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित सायकल रॅली आज यावल शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष यावल-रावेरचे आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकी संघ यावल येथून बुरुज चौक मार्गे बोरावल गेट मार्गे सिनेमा चौक तर चोपडा रस्त्यावरील पेट्रोल पंप पर्यंत काढण्यात आली.
या रॅली मध्ये अनेक कार्यकर्ते सायकल घेऊन सहभागी झाले. यावेळी महागाई विरोधात आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सह्यांची मोहीम पेट्रोल पंपावर राबवण्यात आली. यावेळी आ. शिरीष चौधरी यांच्यासह जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी शहरातून सायकल रॅली जात असतांना जनतेनेही हात देऊन रॅलीचे समर्थन केले. यावेळी उपस्थितांमध्ये माजी आ. रमेश चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंगबापू पाटील, प. स. गटनेते शेखर पाटील, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलभाई पटेल, युवानेते वाढोदा गावचे सरपंच संदीप सोनवणे, नगरसेवक मनोहर सोनवणे, गुलाम रसूल मेंबर, नगरसेवक समीर मोमीन, जाकीरभाई, अस्लम शेख, समीर खान, फैजपूरचे सर्व नगरसेवक, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई, युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जनाब, यावल शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, काँग्रेस सेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, शहराध्यक्ष नईमभाई शेख, विक्की पाटील, विनोद पाटील, तौफिक शेख, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, बामनोद गावचे सरपंच राहुल तायडे, कोरपावली गावचे सरपंच विलास अडकमोल, गौरव महाजन, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, लीलाधर सोनवणे, समाधान पाटील,रमेश पाटील, धीरज महाजन, अशपाक शाह, किरण सोनवणे, चेतन सोनवणे, विक्की सोनवणे, धीरज सोनवणे, राजू पिंजारी, इम्रान पहेलवान, सत्तारभाई तडवी, बशीर तडवी, पुंडलिक बारी, अभिषेक इंगळे उपस्थित होते.