पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आयोजित कार्यक्रमात राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे आणि ना. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पत्रकारांना हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी रक्तदान शिबिर आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यासह ना. एकनाथ शिंदे, ना. गुलाबराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील, देवेंद्र साळी, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाखडा आदी उपस्थित होते
यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. भूषण भगात, डॉ. स्वप्नील पाटील यांच्यासह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, असोदा, एरंडोल येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दोन सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे होते. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४५ पत्रकार बांधवांनी रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सपकाळे, जळगाव महानगराध्यक्ष कमलेश देवरे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले, तर पत्रकार संघाच्या विविध तालुका पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रास्ताविक किशोर रायसाखडा यांनी केले.
याप्रसंगी विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की सदैव पत्रकारांच्या पाठीशी संघ उभा आहे. राज्यात छत्तीस जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे. संघटनेचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे. तसेच यापुढेही पत्रकार हिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सी एन चौधरी, गणेश रावळ, संजय चौधरी, विलास साठे, महिंद्र सूर्यवंशी, चेतन निंबाळकर, अनिल येवले, भगवान मराठे, गोपाल सोनवणे, विनोद कोळी, अबरार मिर्झा, अनिल येवले, नीलेश मराठे, चेतन महाजन यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेश कवडीले व गौरी बारी यांनी केले. आभार शांताराम चौधरी यांनी मानले.