जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात जुना निष्ठावंत शिवसैनिकांनी संघटना उभी केली आहे. त्यांनी केलेल्या कामामुळेच आज संघटनेला महत्त्व आले आहे. त्यासाठी संघटन कौशल्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले.
शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहात संपर्क अभियान राबवण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. गुलाबराव पाटील म्हणाले, संघर्ष अभियान जिल्ह्यात राबवणे महत्वाचे आहे. परंतु ते राबवित असतांना टीकेला प्रत्युत्तर दिले पाहिजे. आरोप करणे सोपे असते. प्रत्यक्ष व्यक्तीने केलेल्या कामाची जाणीव ठेवली पाहिजे असा चिमटाही त्यांनी घेतला. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेनेतील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .