पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव ,भडगाव येथील शिवसैनिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून अद्याप पर्यत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्हाला शासकीय समिती वर घेतलेले नाही असा आरोप उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी यांनी केला आहे. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली आहे या दरम्यान पारोळ्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत,आ चिमन आबा पाटील,सह संपर्क प्रमुख गुलाब वाघ,जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने,जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्यासह एरंडोल,पाचोरा,चाळीसगाव विधानसभेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय नियुक्त्या केल्या होत्या मात्र शिवसेनेचा पालकमंत्री असताना गेल्या दोन वर्षांपासून संधी देण्यात न आल्याने या संदर्भात शिव संपर्क अभियानात जाहीर वाच्यता करण्यात आली आहे.
शिव संपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेत शासकीय समित्या नियुक्ती वरून वाद चव्हाट्यावर आला आहे, थेट जाहीर कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केल्याने शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा दिसून आली आहे.