जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हिरवेगार स्मार्ट व्हीलेज निर्मितीचा संकल्प केला असून, वृक्षारोपणासाठी शिस्तबद्धपणे खड्डे खोदण्याच्या कामास ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासन दरवर्षी 100 झाडे लावते. जगण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करते. त्यापैकी बरेच झाले जगलेली आहेत. या वर्षी राजमाता जिजामाता उद्यान व मंगल कार्यालय या ठिकाणी 200 झाडे लावण्याचा उपक्रम आखण्यात आला आहे. त्यापैकी 50% फळ झाडे लावण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी नियोजनबद्ध लाईन आखून सात फूट अंतरावर एक झाड असे नियोजन केले आहे. त्यासाठी वेळोवेळी पाणी टाकता यावे यासाठी जेसीबीच्या माध्यमातून रस्ते व खड्डे खोदकाम करण्याच्या कामास सुरु झाला आहे. खड्डे काम पूर्ण झाल्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम तांत्रिक दृष्ट्या ट्रीगार्ड सहित, लागणारी माती असे व्यवस्थापन पूर्ण झाल्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येईल. प्रत्येक झाडाला एक नाव देण्यात येणार आहे व ते जोपासण्याची जबाबदारी त्या परिवारावर देण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे, रवींद्र पाटील, गोपाळ पाटील, प्रदीप कोळी, पंकज ठाकूर, पप्पू पाटील आदी उपस्थित होते.