जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राजकीय षड्यंत्रातून ईडी या संस्थेचा वापर करून खडसे कुटुंबीयांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने निवेदन सादर करून जाहीर निषेध केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना विधीमंडळात व वृत्तपत्रांच्या माध्यमातून धमक्या देणे सुरू आहे. केंद्रातील सरकारच्या व राज्यातील भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले की धमकी दिली जाते. विनाकारण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ईडीसारख्या संस्थेचा वापर राजकीय स्वरूपात होत आहे. याच्या माध्यमातून असे भासवले जाते की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नका, भ्रष्टाचारावर बोलू नका, सरळ सरळ असे वाटते की ईडी वापर भाजपाच्या कार्यालयातून होतो आहे. या प्रवृत्तीचा राष्ट्रवादी निषेध करीत आहे. एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. त्याचाही निषेध करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे संचालक संजय मुरलीधर पवार, महानगर शहर अध्यक्षा मंगला पाटील, कल्पिता पाटील, परेश कोल्हे, नामदेवराव चौधरी, सचिन पाटील, अरविंद मानकरी, राजेश गोयल, मीनाक्षी चव्हाण, अशोक लाडवंजारी, सुनील शिंदे, किरण राजपूत, नईम खाटीक, सलमान खाटीक, अनिल पवार, पराग पाटील आदी उपस्थित होते.