जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी सात वाजता धरणाचे सहा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. दिनांक १२ जुलै रोजी सकाळी सात वाजता तापी नदीपात्रात ४५८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले. पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कोणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.