दीपनगर राजमुद्रा वृत्तसेवा | दिपनगर ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम मध्यंतरीच्या कालावधीत ठप्प झाले होते. त्यामुळे दोन वेळा मजुरांनी केलेले पलायन, औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन वायू मिळत नसल्याने ही अडचण आली होती. यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा बारा-तेरा महिने लांबणीवर पडणार आहे. मार्च २०२२ ऐवजी आता एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. यासाठी मुख्यालयाकडून मुदतवाढ मागण्यात आली आहे. कोरोनाने प्रकल्पाचे काम दोन वेळा बंद राहिले. सध्या प्रकल्पात चौदाशे पेक्षा जास्त कामगार आहेत. मध्यंतरी कामांना गती असली तरी वाया गेलेला ९ महिन्यांचा वेळ भरून काढणे एक मोठे आव्हान आहे. तसेच पावसाळ्यात कामांचा वेग कमी होतो. यामुळे नियोजित प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.