रावेर राजमुद्रा वृत्तसेवा [ जयंत भागवत ] रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांकडून खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याचा प्रर्यत्न सुरु असून यात सेटलमेंट झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल यसेच या प्रमाणपत्राची पडताळणी जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री मारुती पोटे व त्यांचे सदस्य सलीम शेख यांच्यामार्फत करण्याची मागणी अपंग बांधवांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ग्रामसेवकांचे सुरु असून या प्रकरणाची पडताळणी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्फत पडताळणी जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी मारुती पोटे व त्यांचे सदस्य सलीम शेख यांच्यामार्फत करावी. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे सेटलमेंट झाल्यास तसेच ग्रामसेवकांच्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास सर्व दिव्यांग बांधव तर्फे रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा भाजप तालुका यांनी दिला आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिव्यांगा आघाडी रजनीकांत शामराव बारी, सचिव संदीप पाटील दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष संजय दिनकर बुवा, उपाध्यक्ष घनश्याम हरणकर तालुका अध्यक्ष ईश्वर महाजन, उपाध्यक्ष महेश महाजन, संजय माळी, मूकबधिर अध्यक्ष निलेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह मोठ्या संखेने दिव्यांग बांधव उपस्थित होते.