(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे रोटरी फाउंडेशनला दोन कोटी रुपयांची देणगी देणारे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांचा नुकताच जाहीर सत्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम मायादेवी नगरातील रोटरी भवनात घेण्यात आला. रोटरी ३०३० चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी रोटरी भवन फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमासाठी 1 कोटी 82 लाख 50 हजार एवढी रक्कम देणगी दिली आहे. रोटरी फाऊंडेशनच्या आर्च क्लंप सोसायटीचे सदस्य होण्याचा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या मुख्य कार्यालयात नाम फलकावर त्यांच्या नावाची नोंद घेतली जाणार आहे. त्यांच्या दातृत्वाचा प्रेरणादायी सत्कार आयोजित केला असल्याचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी यांनी सांगितले.
ऍड सुरज जहांगीर यांनी रोटरी वेस्टच्या कार्याची माहिती दिली. प्रेसिडेंट लक्ष्मीकांत मणियार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानस सचिव अनुप असावा, माजी सह प्रांतपाल गनी मेनन, रश्मी शर्मा, महिमा शर्मा आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी अनंत भोळे, गोविंद मंत्री, संगीता पाटील डॉ. अरुण बगडिया, रमण जाजू, नितीन रेदासानी, विनोद बियाणी, किरण राणे, अनिल कांकरिया, डॉ राजेश पाटील, राजेश चौधरी, नीरज अग्रवाल, विपुल पटेल आदी उपस्थित होते.