(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव जिल्हा परिषदेत कोरोना काळातील पहिलीच ऑफलाइन सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची ही पहिलीच सभा राहणार आहे.
या सभेची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. निधीसह विविध प्रलंबित विषयांवर सभा चांगली रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सभेत अर्थसंकल्पीय सभा आणि त्यानंतर होणाऱ्या नियमित ऑनलाईन सर्वसाधारण सभेतील विषय चर्चेला येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विरोधक सत्ताधारी आपापसात काही विषयात एकमेकांविरोधात उभे राहण्याचे बोलले जात आहे. दरम्यान जिल्हा परिषदेची सभा राजकीय खडाजंगी होऊन गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.