(पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा) पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व उन्नती महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता येवले (वाणी) या नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात. त्यांनी लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी त्या सतत प्रयत्न करीत असतात. पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती त्या सदस्या असून त्या माध्यमातून न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
बचत गटाच्या महिलांना मदत करीत असता त्यांनी स्वतःची उन्नती महिला पतसंस्था स्थापन केली असून त्या बँकेच्या त्या चेअरमन आहेत. सोबतच त्यांनी समाजातील इतर महिलांना त्यात संचालक केले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली आहे. त्यांनी त्यांचा वाढदिवस कुठलाही प्रकारे जल्लोषात साजरा न करता त्या खर्चातून त्यांनी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील दत्तक घेतलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या वर्षभराचा खर्च करण्याचा संकल्प करून साजरा केला.
या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच पती आबा साहेब, विकास पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती महालपुरे, मनोज पाटील, सुवर्णा पाटील, संगीता येवले या दोघांनी प्रत्तेकी पाच विद्यार्थ्यांचा एका वर्षाचा शैक्षणीक खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती महालपुरे यांनी केले. तर आभार दिनेश लंगडे यांनी केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.