(राजमुद्रा वृत्तसेवा) आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणारअसून येत्या विधासभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची शक्ती वाढलेली असेल अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. स्थानिक निवडणूनका असो वा विधानसभा असो भविष्यात काँग्रेस बळकट होऊन आपली सत्ता प्रस्थापित करेल. ताकाला जाऊन भांडं लपवायचं आमचं काम नाही असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
पटोले यांनी केलेल्या विधानाला उत्तर देत राष्ट्रवादी काँगेसचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पटोले यांचा समाचार घेतला. पुढच्या निवडणूका या 2024 ला आहेत. कोण कसं लढणार हे त्यावेळी बघता येईल. सध्या कोरोनाचा काळ चालू असून निवडणुकांवर बोलण्यापेक्षा कोरोनावर लक्ष देणं गरजेचं आहे. निवडणुकांवर डिसेंबर 2023 मध्ये चर्चा केलेली योग्य राहील असा टोला लगावला आहे.