(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) येथील इक़रा शिक्षण संस्था व इन्डीयन रेडक्रॉस सोसायटी तसेच एच. जे. थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दि. १५ जुलै २०२१ रोजी एच. जे. थीम महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १० ते ४ या वेळेत करण्यात आले आहे.
शिबीरात इक़रा शिक्षण संस्था व्दारा संचलित विविध युनिटचे शिक्षक व विद्यार्थी आपले रक्तदान करतील. तसेच राज्यात कोरोना महामारी मुळे रक्ताचा तुडवडा असल्याने, जळगाव शहरातील नागरिकांनी रक्तदान करावे, असे आह्वान इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह यांनी केलेले आहे.