जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यातील पहूर शहरात गेल्या पंधरा दिवसापासून रात्री-बेरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले असून त्यामुळे गावात चोरीचे प्रमाण वाढले आहे.
पहूर शहर अतिसंवेदनशील आहे. शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला दासांचा उपद्रव होत आहे, असे निवेदन आज सकाळी दहा वाजता शहरातील सर्व पक्ष पदाधिकारी व ग्रामंस्थानी उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना सादर केले.
यावेळी रामेश्वर पाटील, शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, ग्रा प चे ईश्वर देशमुख, संदीप बेढे, भारत पाटील, पत्रकार गणेश पांढरे, रामभाऊ बनकर, नटराज गोयर आदी उपस्थित होते.