(राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्टात सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून बीड, वाशीम, हिंगोली, सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणावर शेतीचे मालाचे नुकसान केले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना बुचकळ्यात टाकले आहे. बीड जिल्हयातील लेंढी नदी पूर येऊन दुथळी भरून वाहत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीमाल मोठ्याप्रमाणावर जमीनदोस्त झाला असून कांदा, ज्वारी तसेच हळदी सारख्या उन्हाळ्यात येणाऱ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कोरोना काळात हलाखीची परिस्थिती असतांना अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाचा फटका या जिल्ह्यांना बसल्याचे दिसत आहे. हा अवकाळी पाऊस अजून चार दिवस महाराष्ट्रात आपला परिणाम दाखवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.