जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, उडाण प्रारंभिक बाल विकास केंद्र जळगाव तसेच इनर व्हील क्लब बाय बॉम्बे बे व्ह्यू यांच्या संयुक्त विद्यमाने आज या जागतिक महामारी विरुद्ध लढाव्यासाठी दिव्यांग मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहाराचे वाटप पोलीस अधीक्षक श्री. डॉ. प्रवीण मुंडे व सौ. डॉ. अमृता मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महिनाभराचे प्रोटीन पावडर, खजूर व सकस आहार हे कुपोषित तसेच दिव्यांग मुलांना वाटप करण्यात आले. यासाठी इनरव्हील क्लब बाय बॉम्बे बे व्ह्यू च्या अध्यक्षा अस्मिता झुनझुनवाला, रजनी बारासिया व श्यामा भोसले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी उडान च्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विनोद शिरसाळे, संदीप पाटील, धनराज कासट, चारू इंगळे, चेतन वाणी, तुषार भामरे, पवन शिरसाळे, जयश्री पटेल, चेतन कुमावत व नीता मिश्रा यांनी परिश्रम घेतले.