रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर पंचायत समितीला उद्या सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया भेट देणार आहेत. खोटे अपंग प्रमाणपत्राच्या प्रकरणाचा मुद्दा ऐरणीवर असतांना डॉ आशिया रावेरात कोणती वॉशआऊट करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया उद्या रावेरात भेट देणार आहेत. ते सकाळी अकरा वाजता रावेर पंचायत समितीत दाखल होतील. दरम्यान पंचायत समितीच्या विविध योजनांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पंचायत समिती कडून देण्यात आली आहे. रावेर तालुक्यात सद्या ग्राम सेवकांचे खोटे अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत असतांना सिईओ रावेरला भेट देणार असल्याने त्यांच्या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येत आहे.