चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव शहर महिला काँग्रेसतर्फे महागाई इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शहर महिला अध्यक्षा अर्चना पोळ यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला सहभागी झाल्या होत्या. पेट्रोल पंपासमोर आणि तहसील कचेरीसमोर महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली.
मोर्चात तालुकाध्यक्ष अनिल निकम, देवेंद्र पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, रमेश शिंपी, अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश महासचिव राहुल मोरे, शिवाजी राजपूत, मधू गवळी, प्रज्वल राजपूत, अल्ताफ खान, रवींद्र पोळ, रवींद्र जाधव, पंकज शिरोळे आदी सहभागी झाले होते. तहसीलदार सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.