(राजमुद्रा मुंबई) मुंबई येथील बीकेसी लसीकरण केंद्रावर सकाळपासून फार मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. लसीकरण केंद्रावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शनिवारी (ता 8) नागरिकांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते . मात्र शनिवारच्या लसी संपल्या कारणाने नागरिकांना टोकन देऊन आज (ता 10) सोमवारी बोलावण्यात आले होते. या संदर्भात नागरिकांना टोकनही देण्यात आले होते. आज सकाळी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन विचारणा केली असता शनिवारच्या लसी रद्द करण्यात आल्या असून आज फक्त नव्या हजार नागरिकांना लसी दिल्या जातील असे केंद्रावर सांगण्यात आले.
शनिवारी लस न मिळालेल्या नागरिकांना पुन्हा नोंदणी करून लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला तेव्हा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ करून आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. शनिवारी लस रद्द झाल्याबाबत नागरिकांना सोमवारी बोलवण्यासाठी टोकन देण्यात आले होते मात्र आता या टोकांचा काही उपयोग नाही असे केंद्रावर सांगण्यात आले. या प्रसंगी नागरिकांनी माध्यमांशी बोलून आपल्या व्यथा बोलून दाखवला. सकाळपासून या केंद्रात नागरिकांची रांग वाढत असून नागरिक करण्यासाठी ताटकळत उभे आहेत.
मुंबईतील बीकेसी जम्बो लसीकरण केंद्र हे महत्वाच्या लसीकरण केंद्रांपैकी एक असल्याने केंद्राचा असा हलगर्जीपणा नागरिकांना त्रासदायक ठरत असून भोंगळ कारभाराचा आरोप नागरिक करत आहेत. आता या उर्वरित नागरिकांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.