पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा | जे लोक पदे घेऊन काम करीत नसतील त्यांना जळगाव जिल्हा संपर्क मंत्री अजित पवार यांचा दौरा होण्याच्या आधीच नारळ द्यावे. कारण पदे घेऊन काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर अजित पवारांचे खूप प्रेम असते. पुढील आठवड्यात त्यांचा जळगाव दौरा निश्चित आहे. पक्ष संघटना वाढविण्यासाठी पक्षाचे काम करणाऱ्यांना संधी द्यावी. ग्राम पातळीपासून क्रियाशील सभासदांची पक्षात बांधणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी केले.
पक्षाच्या झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांच्या संपर्क कार्यलयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी पक्ष निरीक्षक अविनाश आदिक, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे संचालज संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शिक्षक सेलचे गजानन गव्हारे, मनोराज पाटील, सामाजिक न्यायचे अरविंद मानकरी, भाईदास सरदार, कार्याध्यक्ष दीपक पाटील, नामदेव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रोहन पाटील यांनी युवक जोडो अभियान अंतर्गत पक्षात युवक मोठया प्रमाणात जोडले जात असल्याचे सांगितले, तर जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी ज्यांना पदाची गरज नसेल अशा काम न करणाऱ्या लोकांची पदे काढुन ती पदे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तीला द्यावी. जर आपले खालून पक्ष संघटन मजबूत होईल तरच आगामी काळात जिल्हा परिषद आपण ताब्यात घेऊ शकतो. म्हणून कार्यकर्त्यांची मोट बांधा, असे सांगितले.
प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बाळू पाटील तर सूत्रसंचालन व आभार अंकुश भागवत यांनी मानले. महिला अँड माधुरी पाटील, सुवर्णा पाटील, सुनंदा शेंडे, गीतांजली पाटील, भास्करराव पाटील, संतोष महाजन, दिपक पाटील, मन्साराम चौधरी, युवराज पाटील, उमेश पाटील, जिजाबराव पाटील, मेहमूद पठाण, अविनाश जाधव, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.