नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा | नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावापासून शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख विक्रांत बाबा मोरे यांनी आसाणे गावाला शवपेटी भेट दिली.
आज आसाणे गावात शिवसंपर्क अभियानाचे औचित्य साधत गावासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत नूतन शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील यांच्या प्रयत्नातून गावासाठी शवपेटी आणण्याचा विचार होता. आज प्रत्यक्षात शवपेटी लोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख विक्रांत बाबा मोरे तसेच उपजिल्हाप्रमुख रवींद्र सिंग गिरासे, माजी जिल्हाप्रमुख तथा सहसंपर्क प्रमुख दीपक आण्णा गवते, जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंत्रे, मोठाभाऊ नागरे, सरपंच चंद्रकांत पाटील, रामकृष्ण पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुल पाटील उपतालुका प्रमुख शिवसेना नंदुरबार यांनी परिश्रम घेतले.